Doremon

पोट्टे ! एवढा उशिर ?? नागपुरच ट्राफीक माहिती आहॆ ना आबु !!! उशिर तर होनारच ...... आणि ह्या कोन ?..या माझ्या मैत्रिणी ..सई आणि जान्हवी ......... अशाप्रकारे आनंदीने तिच्या आबुशी ओळख करून दिली.
आनंदी देशमुख म्हणजे महालातली राजकन्या! नागपुरला ती तीच्या चुलत आजोबांबरोर असते.. तिच्या आजोबांकडे आम्ही पहिल्यांदाच गेलो होते.
विशाल असा वाडा,त्याची डोळे दिपवनारी भव्यता, दिव्यता, घरात कशाचीही कमी नव्हती...माणसांचीच तेवढी कमी जाणवली त्या घरात !!!!....पण माणसांची कमी पुर्ण करणारी एक मोठी भींत होती, त्यावर अनेक आठवणी लटकत होत्या ,आणि या आठवणींना धुळ लागु नये,याची आबु पुरेपुर काळजी घेतात. सर्व आठवणींच्या मधात एक मोठा typical family photo...होता frame    करून ..दोन मुलं,  सुना, मुलगी,जावायी,नातवंड, आबु आणि आजी.
बरेच दिवसा आधी आजी जग सोडून गेली,मुलंही foreign ला settled झाली...आबुनीही settled करून घेतल स्वत:हाला आठवणींच्या भिंतीमध्ये. त्या भिंती  एकेरी संवाद साधायच्या आबुबरोबर  ,हजारो आठवणी त्या सांगायच्या...पण आबुच ऎकायलाही कोनणीतरी पाहिजे होत...त्यामुळे आनंदीला ठेवल त्यांनी जवळ , घरचे काम करण्यासाठी तर कमला ताई होत्याच .
आनंदीने तिच्या आबुशी ओळख करून दिली .....हे माझे "Doremon " ......अगदी साजेश नामकरण केलं होतं आनंदीने !!!
 गोरेपाण ,धडधाकट ,उंचपुरे,शरिर थकलेल पण आवाज तेवढाच दमदार ,भारी शरिर ,त्याला
साजेश royal पोट त्यावर ढिली ढाली cotton ची बनियान आणि पायजामा घालुन अगदी एक एक पाऊल उचलत ..डोलत डुलत चालत होते.
 एकंदरीत काहिसे adorable आबु होते आनंदीचे !
 दिवसाचे तास आधीच प्रत्येक कामासाठी विभागलेले ..त्यात जराही मागेपुढे झालं की ओरडायचं मग ,अख्ख घर डोक्यावर घ्यायच!!!
पानदानापासुन ते पलंगापर्यंत  घरातील प्रत्येक गोष्टीत त्यांचा जिव ...आणि हो त्या काचेच्या कपावर तर त्यांच विशेश प्रेम!!
आम्ही  गेलो होतो  तेव्हा बरेच खुश होते आबु
डोलत डुलत आनंदी जवळ आले.. प्रेमाने तिचे गाल ओढत म्हनाले "..I have surprise for you !!!!..बरोबर 1 वाजता तयार रहायच ...आज बाहेर जाऊया जेवायला!!!!!!!!
 त्यांच खुप दिवसाच अडलेल काम पुर्ण झाल होत
Visa मिळाला होता त्यांना मुलाकडे जाण्याचा..
नातवंडाना भेटण्याचा आनंद अगदी लहानमुलाप्रमाने साजरा करत होते ते,
वाटलं चला परदेशी जाऊन बसलेल्या Nobita ला त्याचा Doremon परत मिळनार!!!!! मग ते थोड्याच दिवसासाठी का होई ना!!!!!

Comments

Popular Posts