पारिजात


नाजूकशा देठावरती अलगद उमलावं,

जसे तुझे प्रेम ,


पाहता हसतांना तुला,

मीही हसावं , मीही फुलावं ,


कोमेजलेला चेहरा बघता तुझा ,

मी ही कोमेजावं .


अलगद वाहत्या वाऱ्यासंगे मीही दरवळावं,

तुझ्या भवती,


असुया त्या पारिजातकाची मला ,

जी बहरते तुझ्या अंगणी


आता असे मनी एकच भाव माझ्या

सुंदर आहे हा क्षण

हा क्षण सदैव असाच रहावा


तुझ्या अंगणातला पारिजात मी व्हावा ,

तुझ्या अंगणातला पारिजात मी व्हावा


शिवानी


Comments

Popular Posts